यंग पर्सपेक्टिव 

मी की आपण?

By Ritika Shrotri
20, Pune

एखादया कलाकृती साठी प्रारंभ बिंदू म्हणजे एक ‘idea’. ही idea कधीही कुठेही कशीही सुचू शकते. अगदी बाथरूम मधे अंघोळ करताना ते एखादं music ऐकल्या मुळे. या lockdown मधे अनेक कलाकारांना अशा अनेक idea सुचल्या पण एका idea पासून ते कलाकृती घडवण्या पर्यंत चा प्रवास फार सोपा नसतो आणि या lockdown च्या काळात तर नाहीच. मात्र गरज ही शोधाची जननी असते. काही कलाकारांना वाटलं की आता आपल्या कडे internet आहे, Zoom आणि Skype सारखे apps आहेत मग आपण का फक्त थिएटर्स बंद आहेत म्हणून आपल्या कलाकृती वर बंधन घालतोय? 

 

 

 

 

 

या कलाकारांचा एक ग्रुप जमला या ‘ऑनलाईन नाटका’ वर चर्चा करायला. Ideas अनेक जणां कडे होत्या मात्र कुठल्या idea ची कलाकृती होणार हा सगळ्यां समोरचा मोठा प्रश्न होता. वयक्तिक हिताचा विचार करावा का समूहाच्या हिताचा? एखादया नाटकात जेवढा दिग्दर्शक महत्वाचा असतो तेवढाच एक backstage करणारा माणूस. पण ज्या नाटकात मी दिसणारही नाहीये ते नाटक एवढे तासंतास कष्ट घेऊन मी करावं? ज्या नाटकात मी mob मधेच आहे, असलो नसलो तरी काही फरक पडणार नाहीये. ज्या नाटकात मी easily replaceable आहे त्या नाटकात मी का काम करू? असे विचार कधी ना कधीतरी मनात येऊन गेले असतीलच. तरी या सगळ्या कलाकारांना एकत्र येऊन काहीतरी experiment करायची होती म्हणून काहीतरी वाट काढली आणि सगळ्यात interesting वाटणारी idea निवडली. आता या कलाकृती चा आकारास येयचा प्रवास सुरु झाला. मात्र हा समूहिकता आणि व्यक्तिवाद यांचा द्वंद्व काही संपला नाही. वयक्तिक ध्येय सगळ्यांची असतात मात्र ती समूहाच्या ध्येया वर ठेवावी? पण हा ग्रुप आयुष्य भर कुठे असणार आहे?

 

 

        मग त्यांच्या साठी आपला व्यक्तिवाद का सोडावा?  Individualism stresses individual goals and the rights of the individual person. Collectivism focuses on group goals, what is best for the collective group, and personal relationships. हे sociology च्या पुस्तकात नुसतं वाचलं होतं मात्र एक कलाकृती घडवण्याच्या काळात हे द्वंद्व सगळ्यांनी खऱ्या अर्थाने अनुभवलं. मी की आपण?सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न होता. प्रयोगाच्या आदल्या दिवशी शेवटच्या stretch ला laptop crash झाला आणि online नाटक दिसलच नाही. या मुळे सगळ्यांच्या मनात कुठेतरी कलाकृती वरचा विश्वास कमी झाला होता. कदाचित व्यक्तिवादच ठरेल वरचढ. नाटकच उभं नाही राहीलं तर काय संबंध सामूहिकतेचा?  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

चर्चा, वाद विवाद, टिका, तालमी, तांत्रिक अडचणी या सगळयांवर मात करत हळू हळू ती कलाकृती आकार घेऊ लागली. शेवटी प्रयोगाचा दिवस उजाडला. २० लोकांची team तयार होती त्यांची कलाकृती सादर करायला. माध्यम, लोकं, सगळंच खूप नवीन होतं. या कलाकृतीचा या प्रयोगात जन्म होणार होता किव्हा मृत्यू. तिसरी घंटा वाजली…कॅमेरे on झाले आणि live streaming सुरू झालं. नाटकाची पहिली ५ मिंट झाली…आज ही २० लोकांची टीम आणि हे नाटक एरवी पेक्षा काहीतरी वेगळं वाटत होतं. आज सगळं जमून आल्या सारखं वाटत होतं… प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून काम करत होता, समोरच्याला सांभाळून घेत होता. ती energy, ते feeling काहीतरी वेगळंच होतं. नक्की काय झालं होतं तेव्हा? प्रत्येक व्यक्ती स्वतःचं काम चोख करत होती? नाही पण ते रोज च सगळे करतात… मग आज या प्रयोगात असं काय वेगळं घडत होतं? प्रत्येक कलाकार फक्त स्वतः साठी नाही तर त्या कलाकृती साठी काम करत होता. अचानक व्यक्तिवाद आणि समूहिकता यांच्या मधला द्वंद्व संपला होता कारण त्या ६० मिनिटां पुरतं सगळ्यांचं ध्येय एक झालं होतं, कलाकृती ला न्याय देणं. कितीही वयक्तिक मतभेद असू देत मात्र त्या दिवशी एका समूहाची ताकद खऱ्या अर्थाने कळली. Sociology च्या पुस्तकात फक्त definition वाचलं होतं, व्यक्तिवाद कसा हानिकारक ठरू शकतो हे वाचलं होतं. मात्र हे एक नाटक घडवण्याच्या process मधे हा द्वंद्व मिटला नसला तरी त्या वर एक समाधानकारक उत्तर मिळालं. समूहाची ताकद व्यक्ती आहे आणि व्यक्तीची ताकद समूह. 

Would you like to write for Thespo Ink? Click here to tell us about your ideas!

© 2020 by Thespo.org

This site was designed with the
.com
website builder. Create your website today.
Start Now